सारांश छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकातील अत्यंत प्रतिकूल राजकीय, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीत मराठा स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या यशामागे केवळ लष्करी पराक्रम नव्हता, तर उपलब्ध नैसर्गिक, मानवी आणि आर्थिक संसाधनांचा अत्यंत कार्यक्षम, नियोजनबद्ध आणि शाश्वत उपयोग हे प्रमुख कारण होते. या संशोधन लेखात छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी, जलसंपत्ती, जंगले आणि जमीन यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा संरक्षण, शेती, आरमार आणि किल्ले व्यवस्थेसाठी कसा प्रभावी वापर केला याचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच मावळे, अष्टप्रधान मंडळ, लष्कर आणि हेरखाते या मानवी संसाधनांच्या संघटनातून स्वराज्याचा पाया कसा भक्कम केला गेला, याचा अभ्यास करण्यात आला आहे. महसूल व्यवस्था, चौथ–सरदेशमुखी, युद्धातील लूट आणि मीठ व्यापार यांद्वारे शाश्वत आर्थिक संसाधने कशी निर्माण झाली, हेही या लेखात स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संसाधन व्यवस्थापन हे लोककल्याण, पर्यावरणीय संवर्धन आणि संरक्षण यांचा समतोल साधणारे होते. त्यामुळे त्यांची शासनपद्धती आधुनिक काळातील संसाधन व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासनासाठीही मार्गदर्शक ठरते.
अनिकेत यशवंत नरके (Sat,) studied this question.
Synapse has enriched 5 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context: