मराठी आत्मचरित्र साहित्य ही केवळ वैयक्तिक जीवनकथा नसून ती व्यापक सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक वास्तवाचे दस्तऐवजीकरण करणारी प्रभावी साहित्यप्रकार आहे. विशेषतः दलित, ग्रामीण व कामगार वर्गातून आलेल्या लेखकांच्या आत्मचरित्रांमध्ये दारिद्र्य, उपासमार, श्रम, शिक्षणासाठीची धडपड, स्थलांतर व सामाजिक भेद यांचे जिवंत चित्रण आढळते. या आत्मकथनांतून व्यक्तीच्या आर्थिक संघर्षासोबतच सामाजिक उन्नतीचा प्रवास स्पष्टपणे मांडला जातो. सदर शोधनिबंधात दया पवार, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे, उर्मिला पवार व नरेंद्र जाधव यांच्या आत्मचरित्रांच्या आधारे आर्थिक संघर्षाचे स्वरूप, शिक्षणाची भूमिका, रोजगाराचे बदलते मार्ग आणि सामाजिक स्थानातील परिवर्तन यांचा अभ्यास करण्यात आला आहे. आत्मचरित्रांतून केवळ वैयक्तिक यश नव्हे तर संपूर्ण समाजाच्या उन्नतीची आकांक्षा व्यक्त होते, हे अधोरेखित करणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे.
Prof. Dr. Sanjay Bhaskar Kadam (Sun,) studied this question.