कादंबरी हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मयप्रकारापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन या वाङ्मयप्रकारात घडत असल्यामुळे तो एक महत्त्वपूर्ण वाङ्मयप्रकार आहे. परंपरेने चालत आलेल्या मौखिक गोष्टी लिखित स्वरुपात ज्यावेळी आल्या त्यावेळी त्या कथा म्हणून प्रसिध्द झाल्या. नंतर त्या पुढे लघुकथा, दीर्घकथा, लघुकादंबरी या स्वरुपात विकसित झाल्या. कादंबरीतील विषय मानवी जीवनाशी निगडीत असतो. कादंबरीकारांच्या माध्यमातून समाजजीवनात घडणाऱ्या घटना, निर्माण होणारी विशिष्ट परिस्थिती, राजकीय, सामाजिक बदल यांचे परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कादंबरी निर्मितीवर होत असतात.
Dr. Suresh Laxman Najan (Sun,) studied this question.