योग प्रशिक्षण आणि जल व्यायाम यांचा एकत्रित अभ्यास धावण्याच्या वेगावर आणि भावनिक क्षमतेवर सकारात्मक परिणाम करतो. योग स्नायूंची लवचिकता, ताकद आणि संतुलन सुधारतो, तर जल व्यायाम कमी ताणात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम प्रदान करतो. योग मानसिक शिस्त, श्वासोच्छ्वास आणि लवचिकता देऊन धावण्याच्या वेगावर आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. जल व्यायाम दुखापती टाळून आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती राखून शारीरिक कार्यक्षमतेला हातभार लावतो, 13 आठवडे योग प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या शारीरिक क्षमतेवर चांगला परिणाम होऊन त्यांची भावनिक क्षमता विकसित होऊन जीवनाकडे व खेळ व स्पर्धा याकडे बघण्याचा हेतू व भावनिक क्षमता कणखर झाल्याने योग प्रशिक्षण कार्यक्रमाची उपयोगिता सिध्द झाली. व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीकोनातुन महर्षी पतंजलींची योग साधना महत्वाची आहे हे ग्रामीण विद्यार्थी यांच्यावर राबविलेल्या योग प्रशिक्षण कार्यक्रमातुन आढळून आली. तसेच दुसरा पाण्यातील (जल) व्यायाम प्रशिक्षण गटासाठी 13 आठवडे पाण्यातील (जल) प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीयांच्या शारीरिक क्षमतेवर चांगला परिणाम होऊन शारीरिक विकासाबरोबरच भावनिक क्षमतेचाही विकास झाल्याचे दिसून आले.
Dr. Anap Uttam Damu (Sun,) studied this question.