जागतिकीकरणानंतर भारतीय ग्रामीण जीवनात आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक स्तरांवर मोठे बदल घडून आले. या बदलांचा प्रभाव ग्रामीण साहित्यावरही स्पष्टपणे दिसून येतो. प्रस्तुत अभ्यासात जागतिकीकरणोत्तर ग्रामीण साहित्यातील लोककथा, लोककला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे परस्परसंबंध तपासले आहेत. लोककथा व लोककला या ग्रामीण समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे महत्त्वाचे घटक असून, जागतिकीकरणामुळे त्यांचे स्वरूप, आशय व सादरीकरणात बदल झालेले दिसतात. बाजारव्यवस्था, भांडवलशाही, स्थलांतर, कृषी संकट आणि नव्या रोजगार संधी यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने साहित्यामध्ये संघर्ष, विस्थापन आणि सांस्कृतिक ऱ्हास यांचे चित्रण आढळते. या अभ्यासातून जागतिकीकरणामुळे ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि परिवर्तन या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी घडत असल्याचे स्पष्ट होते.
Bhimaji et al. (Sun,) studied this question.