भारताने 1991 मध्ये खाऊजा म्हणजेच खाजगीकरण,उदारीकरण व जागतिकीकरण हे धोरण स्वीकारले आहे. जागतिकीकरण ही एक व्यापक संकल्पना आहे. त्यामुळे जगभरातील सर्वच क्षेत्रांवर जागतिकीकरणाचा प्रभाव आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा, या भाषेचा जागतिक प्रचार- महत्वाचा प्रसार, या भाषेचे संरक्षण,संवर्धन व तिचे आर्थिक परिणाम ही वैचारिक स्तरांवर चर्चिली जाणारी बाब आहे. कारण भाषेचे सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण असून भाषा, समाज, संस्कृती आणि साहित्य हे परस्परपूरक घटक आहेत. या घटकांच्या माध्यमातूनच देशाच्या प्रगती व अधोगतीचा आलेख रेखाटला जातो.
Dipali Arun Kharde (Sun,) studied this question.