भारताची भौगोलिक रचना केवळ नद्या, मैदाने व पठारांनीच नव्हे तर भव्य व उत्तुंग पर्वतरांगांनी देखील समृद्ध झालेली आहे. भारतीय संस्कृतीत पर्वतांना केवळ भौगोलिक घटक न मानता देवत्व, तपश्चर्या, संस्कृती व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले गेले आहे. पुराणे, वेद, महाकाव्ये आणि लोकसाहित्य यांमध्ये सात प्रमुख पर्वतांचा उल्लेख “कुलपर्वत” म्हणून करण्यात आला आहे. हिमालय, अरवली, विंध्याचल, रैवतक, महेंद्र, मलय आणि सह्याद्री हे भारतातील महान सात पर्वत भौगोलिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतातील सप्त कुलपर्वतांचे भू-सांस्कृतिक विश्लेषण या संशोधन लेखाकरिता वर्णनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून वेद, पुराणे, महाकाव्ये, ऐतिहासिक ग्रंथ, धार्मिक साहित्य तसेच भूगोलविषयक संदर्भग्रंथ इ. दुय्यम साधनसामुग्रीचा आधार घेण्यात आला आहे. उपलब्ध दुय्यम माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यात आले आहेत. प्रस्तुत संशोधन लेखामध्ये या सात पर्वतांचे भौगोलिक स्थान, धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक संदर्भ आणि भारतीय एकात्मतेतील योगदान यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
जाधव et al. (Fri,) studied this question.