हा शोध निबंध महाराष्ट्रातील आरक्षण धोरणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वैधानिक स्वरूप आणि सामाजिक-राजकीय प्रभावाचे चिकित्सक विश्लेषण करतो. महाराष्ट्र हे राज्य आरक्षणाचे जनक मानले जाते. कारण १९०२ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात याची मुहूर्तमेढ रोवली. या संशोधनाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि अलीकडील मराठा आरक्षणासह ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या’ (EWS) स्थितीचा अभ्यास करणे हा आहे. विशेषत: महाराष्ट्राने महिलांसाठी राबवलेल्या ५०% आरक्षणाच्या क्रांतीकारी निर्णयाचा प्रशासकीय आणि सामाजिक परिणाम यावर हा शोधनिबंध प्रकाश टाकतो. या संशोधनासाठी ‘गुणात्मक आणि विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा’ वापर करण्यात आला आहे. संशोधनातून असे दिसून येते की, आरक्षणामुळे मागासवर्गीयांच्या आणि महिलांच्या शैक्षणिक व राजकीय स्तरात मोठी प्रगती झाली असली तरी, अंमलबजावणीतील त्रुटी आणि वाढती लोकसंख्या यामुळे आरक्षणावरून सामाजिक ध्रुवीकरण वाढले आहे. मराठा आरक्षणाची मागणी, ५०% मर्यादेचे कायदेशीर आव्हान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा तिढा हे महाराष्ट्रापुढील समकालीन पेचप्रसंग आहेत. संशोधनातून असे स्पष्ट होते की, केवळ नोकरीत आरक्षण पुरेसे नसून, खासगी क्षेत्रांत संधी आणि कौशल्य विकासाची जोड देणे आवश्यक आहे. निष्कर्षात असे सुचवले आहे की, आरक्षणाचे लाभ तळागाळातील उप-जातीपर्यंत पोहोचवण्यासाठी शास्त्रीय डेटा (Caste Census) आणि धोरणात्मक स्पष्टता अनिवार्य आहे. हा शोधनिबंध महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या प्रारूपाचे (Pattern) वस्तुनिष्ठ मूल्यमापन करतो.
राजेश राम कांडगे (Fri,) studied this question.
Synapse has enriched 5 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context: