सारांश भारतीय ग्रामीण व निमशहरी समाजात असंघटित क्षेत्र हे रोजगाराचे प्रमुख साधन आहे. या क्षेत्रातील दुचाकी दुरुस्ती तंत्रज्ञ हे दैनंदिन ग्रामीण जीवनासाठी अत्यंत आवश्यक असले तरी त्यांच्या श्रमांना पुरेसे सामाजिक व आर्थिक संरक्षण मिळत नाही. हा संशोधन पेपर असंघटित क्षेत्रातील दुचाकी दुरुस्ती तंत्रज्ञांच्या श्रमांचे स्वरूप, आर्थिक व सामाजिक असुरक्षा, आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्या जगण्याच्या वास्तवाचे समाजशास्त्रीय विश्लेषण करतो. अनौपचारिक रोजगार, कौशल्याची औपचारिक मान्यता नसणे, सामाजिक सुरक्षा अभाव आणि कमी सामाजिक प्रतिष्ठा यामुळे या तंत्रज्ञांचे जीवन अस्थिर बनले आहे. अनुभवाधारित कौशल्य असूनही धोरणात्मक दुर्लक्षामुळे ते विकासप्रवाहाबाहेर राहतात. हा अभ्यास ग्रामीण समाजबदल, असंघटित श्रम आणि उपजीविकेच्या प्रश्नांना व्यापक संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करतो. धोरणात्मक हस्तक्षेप आणि सामाजिक संरक्षणाची गरज अधोरेखित करतो.
रणजित अशोक मोरे (Sat,) studied this question.