सारांश प्रस्तुत शोधनिबंधात तमिळनाडूतील तंजावर येथील मराठा राजवटीच्या (इ.स. १६७५ ते १८५५) साहित्य क्षेत्रातील योगदानाचा ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांनी स्थापन केलेले हे राज्य फक्त राजकीय केंद्र नसून ते मराठी, तमिळ, तेलुगू आणि संस्कृत या भाषांच्या संगमातून निर्माण झालेल्या एका अद्वितीय बहुभाषिक साहित्य संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. या शोधनिबंधात मराठा राजांच्या साहित्य निर्मितीमागील राजकीय आणि सांस्कृतिक प्रेरणा, त्यांचे वैयक्तिक योगदान आणि त्यांनी विविध साहित्य प्रकारांना दिलेले प्रोत्साहन यांचा आढावा घेतला आहे. शाहजीराजांसारख्या 'अभिनव भोज' पदवीने सन्मानित राजांपासून ते तुकोजीराजांसारख्या संगीतशास्त्रज्ञांपर्यंत आणि सरफोजी राजे (द्वितीय) यांच्यासारख्या ज्ञान-विज्ञान आणि कलासंग्राहकांपर्यंत, प्रत्येक राजाने या परंपरेला कसे समृद्ध केले, याचे विवेचन केले आहे. नाट्य, काव्य, संगीतशास्त्र आणि शास्त्रीय ग्रंथ अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या कामगिरीचा, विशेषतः सरस्वती महाल ग्रंथालयाच्या विकासातील त्यांच्या भूमिकेचा, सखोल अभ्यास या शोधनिबंधात मांडला आहे. या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, तंजावरच्या मराठा राजांचे साहित्यिक योगदान हे केवळ महाराष्ट्राबाहेर मराठी संस्कृतीचे रोपण केलेले रोपण नसून, ते स्थानिक द्रविडी परंपरांशी झालेल्या सर्जनशील समन्वयातून साकारलेले एक तेजस्वी सांस्कृतिक पर्व होते.
No takes yet. Share an insight, caveat, or question.
अमितकुमार गणेश शिंगणे (2026) studied this question.
Synapse has enriched 5 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context: